ऐकावे ते नवलच … निवांत बसलेल्या युवकाला सर्पदंश ; विडिओ व्हायरल
करमाळा समाचार
आज पर्यंत आपण ऐकत आलो आहोत की जोपर्यंत आपण सापावर पाय देणार नाही किंवा त्याला डिवचणार नाव नाही तोपर्यंत तो माणसावर हल्ला करत नाही किंवा एखादी हलदी वस्तू त्याच्या समोर असेल तरच तो चावा घेतो अशा अनेक बाबी आपण ऐकून होतो. पण एक वेगळीच घटना समोर आली आहे. एक युवक निवांत एका ठिकाणी बाहेर बसलेला असताना पाठीमागून एका नागाने त्याच्यावर झपाटा मारला व चावा घेऊन निघून गेला. सदैवाने युवक वाचला आहे.

मागील तीन दिवसांपूर्वी करमाळा शहरा लगत असलेल्या नागोबा मंदिर परिसरात सदरची घटना घडली आहे. या ठिकाणी दिनेश नावाचा एक युवक बाहेर बसलेला असताना काहीतरी विचार करतोय किंवा हाताळतोय असं दिसत आहे. त्याचे दुसरीकडे लक्षही नव्हतं. पण जवळपास पंधरा ते वीस फूट अंतरावर एक नाग वेगात त्याच्या दिशेने येतोय. कुठेच न थांबता तो त्या युवकापर्यत पोहचतो जसे काय त्याच्याजवळच त्याला चावाच घ्यायला यायचेय. अचानक त्याला पाठिमागुन चावा घेतला. विशेष म्हणजे तो युवक कसलीही हालचाल करत नव्हता असे असतानाही थेट त्याला चावा घेतल्याने जेवढे आपण काही नियम ऐकले होते त्या नियमांना अपवाद ठरणारा हा प्रकार आहे.

युवकाला तातडीने करमाळा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. यावेळी त्याच्यावर वेळीच उपचार झाले नाही. तो आता त्रासातून बाहेर आला आहे. सदर घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात परिसरात अडचणीच्या ठिकाणी असाल तर काळजी घ्या.