शालेय परिपाठ पुस्तकाला महाराष्ट्रातून प्रचंड मागणी ; विद्यार्थ्यांसाठी खास ५०% सवलत उपलब्ध
करमाळा समाचार
अजित कणसे लिखित शालेय परिपाठ या पुस्तकाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड मागणी होत आहे. शालेय परिपाठ हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व शाळा-शिक्षक, विद्यार्थी-पालक व विविध स्पर्धा परीक्षार्थी या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त असून हे पुस्तक अभ्यासपूर्ण, वस्तुनिष्ठ माहितीचा खजिना असलेले महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एकमेव परिपूर्ण पुस्तक आहे.

सध्या हे पुस्तक शैक्षणिक क्षेत्रातील बेस्ट सेलर बुक म्हणून नावाजले आहे. या पुस्तकात वर्षभरातील ३६६ दिवसांची परिपूर्ण माहिती दिली असून प्रत्येक दिवसाचे स्वतंत्र पान आहे.
यामध्ये सुविचार, म्हण वाक्प्रचार, पाढा, इंग्रजी शब्द, विचारधन, दिनविशेष, व्यक्तिविशेष, सामान्य ज्ञान, ऐकावे ते नवलच यासह विविध प्रार्थना, गीतमंच, नकाशे, संत-महात्मे, बोधकथा आदींचा समावेश केला आहे. ४२४ पानांचे पुस्तक A४ साईजमध्ये असून पुठ्ठा बाईंडिंग आहे. पुस्तकाची मूळ किंमत ६०० रुपये आहे.
विविध शाळा व विद्यार्थी यांनी एकत्रितरित्या शालेय परिपाठ हे पुस्तक खरेदी केल्यास ५० टक्केपेक्षा जास्त सवलत दिली जाईल, असे कमलाई प्रकाशनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी ८३९०३६५३६६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

