बोरगाव येथे आधार मोबाईल लिंकिंग करण्यास प्रचंड प्रतिसाद
बोरगाव प्रतिनिधी-
ग्रामपंचायत बोरगाव व ब्रांच पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत बोरगाव येथे आधार मोबाईल लिंकिंग करण्यास प्रचंड प्रतिसाद या वेळी तब्बल 135 नागरिकांनी आपला आधार मोबाईल लिंक करून घेतला. यावेळी करमाळा पोस्ट ऑफिस कडून गणेश तरफेवाड आधार ऑपरेटर त्यांनी उत्कृष्ट असे काम केले.

यावेळी पूर्व भागाचे नेते विनय ननवरे, बोरगाव सरपंच गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम भोगल, दिपक भोज, जिप शाळेचे सहशिक्षक काटुळे सर उपस्थित होते यांचे स्वागत पोस्ट मास्तर परमेश्वर भोगल यांनी केले यावेळी श्री सुदर्शन ढवळे, राहुल कांबळे, संतोष ननवरे , शिवाजी शिंदे , राहुल घाडगे यांनी सहकार्य केले.
यावेळी गावातील महिला बचत गट अंगणवाडी सेविका मदतनीस , पेन्शनर यांचेदेखील आधार अपडेट करण्यात आले गावातच सोय झाल्यामुळे लोकांनी आधार लिंकिंग करण्यास प्रतिसाद दिला यावेळी सरपंच, ग्रामस्थांनी देखील आभार मानले मानले
