करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

प्रशासक नावालाच शहरातील विविध प्रश्नामुळे नागरीक हैराण

करमाळा समाचार

शहरातील नगरपरिषदेवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक म्हणून प्रांताधिकारी यांच्याकडे नगरपरिषदेचे नियोजन बघण्याची काम देण्यात आले आहे. परंतु शहरातील पिण्याचे पाणी, रस्त्यावरील खड्डे व गावातील घाण असे विविध प्रश्न आजही जसेच्या तसे प्रलंबित असल्याने रोगराई व अडचणींचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागत आहे. त्याशिवाय भटक्या कुत्र्यांचाही त्रास वाढला आहे. यासंदर्भात करमाळा तालुका मित्र मंडळाचे सदस्य उद्या मुख्याधिकारी यांची भेट घेणार आहेत.

करमाळा शहराच्या स्वच्छतेचा ठेका नाशिकच्या ठेकेदार ला दिलेला आहे. परंतु सदर स्वच्छता ही कमी कर्मचारी संख्येत व वेळ मिळेल तसा केली जाते. त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. तर प्रमुख रस्त्याशिवाय गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवरही मोठाले खड्डे पडले आहेत. गणपती उत्सवात सदरचे खड्डे बुजवले जातील अशी अपेक्षा असताना त्यावेळी सदरचे खड्डे बुजवण्यात आले नाहीत.

तर येणाऱ्या नवरात्र उत्सवापर्यंत सदरचे खड्डे बुजवावेत अशी लोकांची अपेक्षा आहे. तर पिण्याचे पाणी आजही कमी दाबाने येत असल्याने दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचणे तर दूरच, तळमजल्याच्या पाण्याच्या नळाला पाणी जास्त वेळ टिकत नाही. त्याशिवाय पाणी आल्यानंतर लोडशेडिंग सारखे पर्याय करमाळा नगरपरिषदेला वापरावे लागतात. तेव्हा कुठे पाणी घरात पोहोचते अशी परिस्थिती आहे.

या सर्व अडचणींवर करमाळा नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी कसलाही लक्ष देत नसल्याने तक्रारींना केराची टोपली दाखवली जात आहे. तर प्रांताधिकारी हे कधी करमाळाकडे फिरतात का नाही अशी शंका यातून निर्माण होते. त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

करमाळा शहराच्या स्वच्छता ठेका दिलेल्या संबंधित ठेकेदाराची चौकशी झाली पाहिजे. शहरात घाणीचे साम्राज्य वाढले असून विविध अडचणीचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. खड्ड्यांच्या तक्रारी करून ही खड्डे बुजवले जात नाहीत. भटक्या कुत्र्यांचा त्रास होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यातून अपघात उद्भवू शकतो. मुख्याधिकारी ही बऱ्याच वेळा सुट्टीवर असल्याने करमाळ्याला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नेमकी अडचण कोणासमोर मांडायची हा प्रश्न आहे.
– करमाळा तालुका मित्र मंडळ, करमाळा

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE