सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या चिखलठाण बंदला शंभर टक्के प्रतिसाद
चिखलठाण प्रतिनिधी –
अंतरवाली सराटा येथील घटनेचा निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या चिखलठाण बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला या गावातील सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे म्हणून अंतरवाली सराटा जि.जालना येथे उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील लोकांवर झालेला लाठी हल्ला व गोळीबार त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्र मध्ये उमटले असताना या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाच्या वतीने तालुक्यातील सर्व गावात ब़ंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते.

यानुसार चिखलठाण येथील ग्रामस्थांनी आज मंगळवार रोजी उस्फुर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी गावातील सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. करण्यात आले होते यावेळी बोलताना सरपंच चंद्रकांत सरडे यांनी झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून लवकरात लवकर त्यावर कडक कारवाई करण्यात यावी. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सकल मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी केली . यानिमित्ताने पुकारलेल्या बंदला केवळ मराठा समाजानेच नाही तर इतर सर्व समाजघटकांनी पाठींबा दिला व्यापारी वर्गाने शंभर टक्के प्रतिसाद दिला.
