करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उद्याच्या मोर्च्याला तालुक्यातुन वाढता पाठिंबा ; आजपर्यतच्या सर्वात मोठ्या मोर्चाचे आयोजन

करमाळा समाचार

जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ उद्या करमाळा शहरातून सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या मोर्चाला तालुक्यातील विविध भागातून पाठिंबा वाढत असून ग्रामीण भागातून गाव बंद पुकारण्यात येत आहेत. तर हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शहरातील विविध संघटनांनी निषेध मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

अमानुषपणे झालेल्या लाठीचार्जचा करमाळ्यात मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी बाह्यवळण रस्त्यावर तब्बल एक तासभर रास्ता रोको केल्यानंतर आता उद्या संपूर्ण तालुक्यातील मराठा समाज आपल्या संपूर्ण ताकतीने करमाळा शहरात उपस्थित राहणार आहे. यासाठी ग्रामीण भागातून वाढता पाठिंबा दर्शवण्यात येत आहे. गावोगावी बंद पुकारण्यात येत आहे व ते बांधव करमाळा शहराच्या दिशेने उद्या येताना दिसतील अशा परिस्थितीत आज पर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा उद्या निघण्याची शक्यता आहे.

सुरुवातीपासूनच विविध पक्ष व संघटनांच्या वतीने सकल मराठा समाजाला वाढता पाठिंबा होता. तर आता करमाळा शहरातील व्यापारी संघटना, मेडिकल असोसिएशन आणि कापड व्यापारी यांच्यासारख्या संघटनांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे. सकाळी दहाच्या सुमारास सदरच्या मोर्चाला महात्मा गांधी पुतळा येथून सुरुवात होणार आहे. हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात येणार आहे. सदरच्या मोर्चामध्ये महिला, मुली, विद्यार्थिनी, विद्यार्थी, युवक, वृद्ध अशा सर्वांचा सहभाग राहणार आहे. महिलांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तर मुस्लिम समाजानेही पाठिंबा जाहीर केल्याने उद्या संबंधित मोर्चामध्ये मुस्लिम व वंचीत, आरपीआय गटाचे नेते दिसणार आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE