करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

विवाहीतेच्या आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या पती व सासुला जामीन

करमाळा समाचार

चारित्र्याचा संशय तसेच हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नवरा व सासुला येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदरचा प्रकरण हे ११ जून २०२५ रोजी करमाळा येथे घडले होते. यावेळी विवाहितेने घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या प्रकरणानंतर सासू- सासरे व पतीवर गुन्हा दाखल केला होता. त्यातील पती व सासुला अटक करण्यात आली होती.

वैष्णवी प्रदिप माने असे मयत महिलेचे नाव आहे. तर पती प्रदीप भारत माने, सासू कमल भारत माने व सासरे भारत माने सर्व रा. कानड गल्ली ता. करमाळा असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी प्रमिला अंगद येरकळ (वय ४६) रा. एसटी कॉलनी धाराशिव, जिल्हा धाराशिव यांनी तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैष्णवी व प्रदीप यांचे डिसेंबर २०१८ मध्ये लग्न झाले होते. दरम्यान दोघांच्या संसारात संशयावरून तसेच माहेरून पैसे आणण्याच्या कारणातून वारंवार वाद होत होते. याबाबत मुलीने आईकडे सांगितले असल्याची तक्रारीत म्हटले आहे. तर वादा नंतर मुलीला आईकडे सोडण्यात आले होते. नातेवाईकांनी मध्यस्थी करून मुलीला पुन्हा सासरी सोडले. तरीही त्रास सुरूच होता असे तक्रारीत म्हटले आहे. या सर्व त्रासाला कंटाळून वैष्णवी हिने ११ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास राहत्या घरी छताला असलेल्या सिलिंग फॅनच्या हुकास ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

ads

याप्रकरणी प्रदीप माने, कमल माने  यांना करमाळा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सदरचे प्रकरण हे बार्शी येथील सत्र न्यायालयात चालवण्यात आले. या ठिकाणी आरोपींच्या वतीने ॲड. भारत कट्टे, ॲड. सुनील घोलप व ॲड. गणेश जगताप यांनी बाजू मांडली. यावेळी संबंधित प्रकरणात तीघांचा जामीन मंजुर करण्यात आला आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE