कॉग्रेसच्या ओबीसी सेल वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन
प्रतिनिधी | करमाळा
पवित्र रमजाण महीन्या निमित्त अखिल भारतीय काँग्रेस आय करमाळा ओ.बी.सी विभागाचे तालुकाध्यक्ष श्री ज.गफुरभाई शेख यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन वाशिंबे येथे करण्यात आले होते.

यावेळी करमाळा कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री चिंतामणी (दादा)जगताप, ओ.बी.सी.विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री राजाभाऊ रुपनवर, करमाळा तालुकाध्यक्ष श्री प्रतापराव जगताप, जिल्हा उपाध्यक्ष श्री.अशोक वाघमोडे, अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष श्री दस्तगीर पठाण,करमाळा तालुका संघटक श्री.संभाजी शिंदे, तालुका सचिव श्री.जैन्नुद्दिन शेख, ता.अल्पसंख्यांकचे उपाध्यक्ष साहील सय्यद,

ओ.बी.सी.शहराध्यक्ष अक्तर सय्यद,तालुका उपाध्यक्ष प्रताप खाडे व अशोक घरबुडे, शुभम देशमुख, दादासाहेब पवार,धर्मराज शिंदे,तालुका संघटक रणजीत कांबळे. अंगद बाबर, दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री.रामदास झोळसर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.भाऊसाहेब झोळ,प्रगतशिल बागायतदार श्री जगन्नाथ जगदाळे,भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.रामदास बप्पा झोळ, माजी सरपंच भगवानअण्णा डोंबावे,वि.का.सेवा सोसायटीचे चेअरमन कांतीलाल झोळ, प्रसिद्धी प्रमुख अमोल पवार, नितीन चोपडे, सुजय जगताप,आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी अखिल भारतीय काँग्रेस आय ओ.बी.सी.विभागाच्या निवडी करण्यात आल्या.
श्री.दिपक ननवरे यांची ओ.बी.सी विभागाच्या तालुका सरचिटणीसपदी तर श्री.इक्बाल शेख यांची ओ.बी.सी.विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या निवडीचे पत्र ओ.बी.सी.विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री राजाभाऊ रुपनवर व करमाळा तालुकाध्यक्ष श्री.प्रतापराव जगताप यांच्या शुभहस्ते देण्यात आले.यावेळी सर्व मुस्लीम बांधवांना ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ अण्णा झोळ,नियाज शेख,अस्लम शेख,इन्नुस शेख,अरहान शेख,युवराज झोळ,असिफ शेख,प्रकाश ढवळे,अंगदनाना झोळ,आनंद भैय्या झोळ,अमित देशमुख इत्यादीनी परिश्रम घेतले.