करमाळ्यातील चोरी सिसिटीव्हीत कैद ; विडिओ आला समोर
प्रतिनिधी – करमाळा समाचार
करमाळ्यात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने करमाळा येथे मुख्य रस्त्यावरील मे. आनंदी ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानांमधून अज्ञात दोन महिला व एका पुरुषाने एकुण सत्तर हजार रुपयांचे दोन तोळ्यांचे शॉर्ट गंठण चोरुन नेण्याची घटना घडली आहे. ही चोरी मंगळवारी दुपारी सव्वा तीन च्या सुमारास करमाळ्याच्या मुख्यरस्त्यावर घडल्याने खळबळ उडाली होती. यांच्या बाबत माहीती मिळाल्यास करमाळा पोलिसांना संपर्क साधावा..
