करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सशयीतामध्ये पोर्टलच्या पत्रकाराचा समावेश

करमाळा समाचार 

लुटमारीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांना हवे असलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. यातील एका आरोपीला पकडल्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली आहे. संबंधित आरोपीला पकडण्याआधी तीन घटना या संशयितांनी घडवल्या होत्या. तर अधिक घटना घडल्या असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या पोलिस ठाण्यात नोंद न झाल्याने त्याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. शेवटच्या घटनेत स्वतः चे नाव सांगितल्याने पोर्टलच्या पत्रकारांसह इतर संशयित जाळ्यात अडकले आहेत.

जेऊर पोफळज व खडकेवाडी येथील तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरी मारहाण लूटमार अशा प्रकारच्या घटनांची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणातील तपासात रंगनाथ ज्ञानदेव जाधव (वय २५) रा. भाळवणी यास करमाळा पोलिसांनी तपास घेऊन अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर संबंधित घटनेची कबुली देत इतर साथीदारांचे ही नावे त्याने सांगितल्याने संपूर्ण प्रकरण उघड झाले आहे.

पहिल्या घटनेत पोपळज येथील कपडे दुकानदार बिभिशन भगवान गव्हाणे यांचा दोन जानेवारी रोजी रात्री दहा वाजता पाठलाग करून डोळ्यात चटणी टाकून मारहाण करीत जवळील जवळपास दीड लाख रुपये या चोरट्यांनी पलायन केले होते. सदरच्या घटनेची तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुसऱ्या घटनेत जेऊर येथील बिल्डिंग मटेरियल व्यापारी प्रमोद विश्वनाथ शिंदे रा. जेऊर हे दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास आपले बिल्डिंग मटेरियल दुकान बंद करून घराकडे जात असताना रस्त्यात लघुशंकेला थांबल्यानंतर गाडीला अडकवलेली पैशाची पिशवी घेऊन अज्ञातांनी पळ काढला होता. सदर पिशवीमध्ये ७० हजार रुपये रोख रक्कम होती. या संदर्भात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत.

तर तिसऱ्या घटणेत देवळाली येथील पिकअप चालक नईमअत्तर फारुक शेख हा खडकेवाडी फाटा येथून मोटरसायकल वर आपल्या सहकार्या सोबत जात असताना त्यांना मारहाण करून त्यांच्याकडे असलेले दोन मोबाईल घेऊन मारहाण केली होती. तर आपण पत्रकार असून तुला काय करायचे ते कर असा दमही त्यातील एकाने या दोघांना दिला होता. पोलीस तपासात संबंधित व्यक्ती हा सोमनाथ वाघमारे पोफळज हा असल्याचे कळाल्यानंतर सदरचा व्यक्ती हा एक पोर्टल चालवतो व मानवाधिकार संरक्षण समितीचा तो तालुका अध्यक्ष असल्याचे त्यांनी स्वतः त्या दोघांना सांगितले होते. यावरून पोलिसांनी तपास करीत त्याच्या इतर साथीदार यांची माहिती काढली व त्यातील एकाला अटक केली. तर इतर तिघे अजूनही फरार आहेत.

सदरचे प्रकरण हे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, तौफिक काझी व अमोल जगताप यांच्या पथकाने कारवाई केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पकडलेल्या संशयीताला दि २१ पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE