पश्चिम भागातील जिंती या मोठ्या ग्रामपंचायतीचा दोन मजली स्वतंत्र केबिन असलेल्या वास्तूचा उद्घाटन समारंभ
करमाळा समाचार – दिलीप दंगाणे
आज पश्चिम भागातील जिंती या मोठ्या ग्रामपंचायतीचा दोन मजली स्वतंत्र केबिन असलेल्या वास्तूचा उद्घाटन समारंभ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जिंतीभूषण मा.श्री.शहाजीराजे भोसले व जिल्हा परिषद सदस्या सौ.सवितादेवी राजेभोसले यांच्या हस्ते संपन्न झाला.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम सुरूवात झाली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सविताराजे भोसले आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की *जिंतीकरांचे प्रेम व आशिर्वाद आम्ही कधीही विसरणार नाही.*जिंती व आपला भाग हे माझे कुटूंब आहे. पश्चिम भागाचे राजकीय प्रतिनिधीत्व हे काटेरी मुकुट घेऊन जात असताना छोट्या-मोठ्या कामाबरोबर सर्वांत जास्त भर हा रस्ते,आरोग्य,शिक्षणाबरोबर कायदा व सुव्यवस्थेवर सुधारणा झालेली असून कोरोना काळात निधीअभावी 30 ते 50 टक्के परिणाम झालेला आहे.कोर्टी गटातील कोविड लसीकरण नियोजन अतिशय उत्तम असून माझे विशेष लक्ष आहे.पश्चिम भागातील प्रत्येक गावात कोणत्याही माध्यमातून निधी पोच करण्याचे काम केलेले आहे विधेयक काम म्हटले तर केत्तूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना,वाशिंबे येथील आरोग्य उपकेंद्रासाठी निधी तरतूदीसाठी मंञालय स्तरावर प्रयत्नशिल आहे.

केत्तूर व कोर्टी गणातील भागासाठी दोन रूग्नवाहिका कार्यन्वित होणार असून जिंती येथे भागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणी झालेली आहे.काञज येथे नविन आरोग्य उपकेंद्रासाठी प्रयत्नशिल आहे. सर्व जिल्हा परिषद शाळा बांधकामे व वर्गखोल्या दुरूस्तीसाठी सर्वांत जास्त निधी आणण्याचे काम केलेले आहे.पश्चिम भागातील पोलिस यंञणेच्या कामावर सतत संपर्क असून शांततेचे सहकार्य म्हणून करमाळा पोलिस स्टेशनचे विशेष आभार व्यक्त केले.भागासाठी पोलिस ठाणे व निवासस्थान कार्यन्वित करण्यासाठी मंञालय स्तरावर पाठपुरावा करत आहे.
आपला भाग अधिक सुविधायुक्त करणेसाठी आपल्या भागाचे परिवर्तन झालेले असताना श्रेयवाद म्हणून मी कधीही जास्त सक्रीय नसून यामध्ये मला रस नाही.आपल्या भागातील ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामस्थ तसेच ग्रामविकास अधिकारी यांची प्रशासनासोबत सतत पाठपुरावा व समन्वय असणे अत्यंत महत्वाचा आहे.
पुढे बोलताना सौ.राजेभोसले म्हणाल्या की, सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मला सभापतीपद मिळत असताना तालुक्याच्या विकासासाठी मी स्वत: माघार घेवून जिल्हा परिषदेच्या सभापतीपदापेक्षा तालुक्याला जिल्हा अध्यक्षामुळे अधिक कामे होतील यामुळे नेत्याला अडचन होईल असे काम कधीच केले नाही.प्रत्येक शब्द प्रमाण मानून काम केले. यावेळी सवितादेवी राजेभोसले व लोकनियुक्त सरपंच संग्राम राजेभोसले यांचा जेष्ठ नागरिकांच्या हस्ते नागरी सत्कार संपन्न झाला.
जिंतीचे लोकनियुक्त सरपंच संग्राम राजेभोसले,प्रा.धर्मेंद्र धेंडे,श्रीमती लक्ष्मी भोसले,महावीर गोरे सर,संतोष जगताप सर,डॉ.निळकंठ कदम,प्रा.शहाजी जगताप यांची भाषणे झाली.सुञसंचलन प्रा.गंगाराम वाघमोडे यांनी केले.ग्रामविकास अधिकारी नवनाथ पांडव साहेब यांनी ग्रामसुरक्षा यंञणेची व गावाच्या विकासात्मक धोरणात संपूर्ण आवाहल सांगून आभार प्रदर्शन केले.
यावेळी उपसरपंच गोरक भोसले,ग्रामपंचायत सदस्य वाल्मिक वाघमोडे,सौ.अनिता शेलार,गणेश घोरपडे,जालिंदर राऊत,इमाम मुलाणी,तुकाराम भोसले,मच्छिंद्र भोसले,बाळासाहेब भोसले,रामभाऊ ओंभासे-पाटील,बलभिम पोटे,मनोहर साळुंखे,गौतम धेंडे,अर्जुन वारगड,अशोक जोशी,सुनिल शेलार,डॉ.शमशुद्दीन शेख,मुरलिधर ओंभासे,दत्ताञय दिंडकर,भारत दिंडकर,नवनाथ गर्जे,हरिश्चंद्र वारगड,औदुंबर पोटे,राजेंद्र भोसले,संभाजी भोसले,हनुमंत पोटे,सुभाष पोटे,अरिहंत दोभाडा,श्रेणिक दोभाडा,शंकर केसकर,दिपक देशमाने,पिंटू दहिदुले,संजय चिंचकर,धर्मराज भोसले,गणेश दहिदुले,पांडूरंग जानभरे,दगडू मुलाणी,जलाल मुलाणी,विलास जगताप,मल्हारी पवार,आयुब मुलाणी,पटेल शेख,शहाजी भोसले,अल्लाबक्ष पठाण,राजाराम शिंदे,बाळासाहेब कुंभार,गणपत नरळे,पोपट धेंडे,रमेश धेंडे,दत्ता शेलार,सुभाष वाघमोडे,विजय वाघमोडे,सुभाष गायकवाड,दत्ता पोटे,दत्ताञय जगताप,हरिभाऊ गायकवाड,शाम ओंभासे,निलेश वारगड,अजित माने,सुधाकर मोरे,अशोक जगताप,दिपक राऊत,नाना वाघमोडे,अमर धेंडे,लाला धेंडे,सतिश माने,जगन्नाथ शिंदे,विष्णू शेलार,बापू शेलार,बलभिम धेंडे,बबन जगताप,बाळू वारगड,शहाजी तोरमल,बाबा वारगड,संजय वारगड,बबन थोरात,संतोष गायकवाड,मारूती धेंडे,जितेश धेंडे,सुनिल धेंडे,शाबुद्दीन मन्यार,भागवत तरटे,अतुल रंदवे,गणेश राऊत,श्रीमती मालन गायकवाड,विद्या काळे,सौ.मंदाकिनी ओंभासे, सौ.वारगड, सौ.चिंचकर पञकार संतोष केसकर अजिंक्य वाघमोडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.