E-Paperकरमाळाक्रिडासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्याच्या सुरज शिंदेची mpl मध्ये झुंजार खेळी ; शेवटच्या 8 चेंडुत खेचले 4 षटकार

करमाळा समाचार

महाराष्ट्र प्रीमियर लिग mpl मध्ये पुणेरी बप्पा संघ puneri bappa अवघ्या 86 धावात निम्म्यापेक्षा जास्त संघ गारद झाल्यानंतर मैदानात तग धरून राहिलेला करमाळा तालुक्याचा सुरज शिंदे याने पुणेरी बप्पा संघाकडुन चमकदार कामगिरी करत संघाला चांगल्या आव्हानापर्यंत नेऊन ठेवले. मात्र संघाचा पराभव झाला सुरज शिंदे 23 चेंडूंचा सामना करत 44 धावा जमवल्या त्यामध्ये चार षटकार दोन चौकार समावेश आहे.

पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स solapur royals मध्ये काल रात्री कडवी झुंज पाहायला मिळाली. सुरुवातीला नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय सोलापूर रॉयल्सने घेतला होता. त्यांचा निर्णय सुरुवातीपासूनच योग्य होता असे वाटू लागले.

सुरुवातीच्या षटकांमध्येच पुणेरी बाप्पाचे खेळाडु एकापाठोपाठ एक तंबूत माघारी परत जात होते. ऋतुराज गायकवाड ruturaj gaikwad मैदानात येईपर्यंत निम्मा संघ गारद झाला होता. त्यावेळी ऋतुराजने येऊन काही फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो जास्त काळ टिकला नाही. 21 चेंडूंचा सामना करत त्याने 25 धावा केल्या. त्यामध्ये चार चौकारांचा सहभाग होता. तो बाद झाला त्यावेळी संघाची धावसंख्या 86 होती.

त्यानंतर मैदानात सुरज शिंदे suraj shinde व अजय बोरुडे ajay borude हे मैदानात खेळु लागले. चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सुरजने आपल्या खांद्यावर घेतली होती. शेवटच्या खेळाडूंसोबत खेळत असताना अखेरच्या पाच षटकांचा खेळ बाकी होता. सूरजने अंतिम षटकापर्यंत चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला.

आत्मविश्वास व जिद्दीने खेळत असलेल्या सूरजने अखेरच्या दोन षटकात आपला खेळ बदलला व सामन्यातील उर्वरित आठ चेंडूं मध्ये चार षटकार खेचत दिशा बदलली. अवघ्या 23 चेंडुत 44 धावांची खेळी करत संघाला चांगल्या धावसंख्ये पर्यत नेऊन ठेवले. सुरज व अजयच्या 54 धावांच्या भागीदारीमुळे संघ 140 चा टप्पा पार करू शकला.

त्यानंतर सोलापूरचा संघ मैदानात उतरला सोलापूर संघाकडून स्वप्निल फुलपगार यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत 52 चेंडूत 68 धावा जमवल्या. त्यामध्ये चार चौकात तीन षटकारांचा समावेश होता. स्वप्निल उत्कृष्ट फलंदाजी करून बाद झाला. संघ अडचणीत होता. परंतु अखेरच्या षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात सोलापूर रॉयल संघाने विजय मिळवला. सदरचा सामना हा सोलापूर संघाने तीन धावांनी जिंकला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE