करमाळा येथे नागराज मशनरी या शेतीसाठी आवश्यक साहित्याच्या पुरवठा करणाऱ्या फर्माचा शुभारंभ
करमाळा ( प्रतिनिधी)
करमाळा येथे नागराज मशनरी या शेतीसाठी आवश्यक साहित्याच्या पुरवठा करणाऱ्या फर्माचा शुभारंभ विठ्ठल पाटील महाराज यांच्या हस्ते व उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व माजी आमदार शामलताई बागल यांच्या उपस्थितीत करण्यात आला.


जैन इरिगेशनचे अधिकृत विक्रेते असलेल्या शेटफळ येथील वैभव पोळ व किरण पोळ या बंधूंनी शेटफळ येथे नागराज मशिनरी या नावाने दहा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या पाईप, ठिबक सिंचन, इलेक्ट्रॉनिक मोटार व शेती उपयोगी साहित्य उपलब्ध करून देणारी फर्म सुरू केली या परिसरातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी करमाळा येथील कमलादेवी औद्योगिक वसाहतीत या फर्मची दुसरी शाखा सुरू केली आहे. मान्यवरांचा उपस्थितीत या शाखेचा शुभारंभ कार्यक्रम आज संपन्न झाला.
यावेळी बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील म्हणाले की शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलांनी शेतीबरोबरच उद्योग व्यवसायाकडे ही वळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्यास शेती करतात शेती बरोबरच शेतीपूरक उद्योग व व्यवसायामध्येही मोठ्या संधी उपलब्ध आहेत याचाही विचार शेतकऱ्यांच्या मुलांनी केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला ग्राहक पंचायतीचे भालचंद्र पाठक , मकाई कारखान्याचे संचालक नवनाथ बागल, अमोल यादव, माजी उपाध्यक्ष रमेश कांबळे, आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष संतोष पाटील, माजी संचालक सुरेश पोळ, जैन इरिगेशनचे किरण पाटील, आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे सुनील जाधव, विजय लावंड, शेटफळचे सरपंच विकास गुंड, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पोळ, पांडुरंग लबडे, दुध संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब लबडे, मनोहर पोळ, माजी सरपंच अनिल पोळ, भारत पाटील, रणजीत लबडे, विजय लबडे, रोहित लबडे, बाबूराव चोरगे, नानासाहेब साळूंके, प्रशांत नाईकनवरे यांच्यासह बहुसंख्य लोक उपस्थित होते.