करमाळा तालुक्यात बाप – लेकीच्या नात्याला काळीमा ; नराधम बापावर गुन्हा दाखल
करमाळा –
तालुक्यात बाप व लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुलगी बारा वर्षाची आहे. बापा विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदरची तक्रार संशयित आरोपीच्या आईनेच दिले आहे. सदरची घटना दि ५ रोजी रात्री साडे आठच्या सुमारास पिडित मुलीच्या गावी घडली आहे.
सदरची घटना अतिशय निंदणीय असुन याबाबत वृतांकन करणेही योग्य वाटत नाही. पण असे नराधम आज आपल्यात आहेत. हे सर्वांच्या लक्षात येण्यासाठी बातमी केली गेली आहे. यासंदर्भात पिडीता व गाव किंवा आरोपीचे नाव जाहीर करता येणार नाही. आपणही याबाबत जास्त चौकशी न केलेली बरी पण अशा लोकांवर तात्काळ आरोप निश्चित करुन कडक शासन करणे गरजेचे आहे.
आपण बातमी करतानाही स्पष्ट लिहले नाही. सदरची घटना समजुन घ्यावी. आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याचा तात्काळ शोध घेऊन त्याच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई कशी होईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. बदलापूर प्रकरणात जे घडले त्यापेक्षा हे प्रकरण लाजिरवाणे आहे. त्यामुळे अशा आरोपींना फाशीची शिक्षाही कमी पडेल. संबंधित आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.