इंदापुरच्या गुंडाचा करमाळ्यात हैदोस ; भाजपा शहराध्यक्ष अग्रवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला
करमाळा समाचार
करमाळा शहरातील मौलाली माळ परिसरात दोन गटात झालेले वाद मिटवण्यासाठी गेल्यानंतर जगदीश अग्रवाल व शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय बैठकीत वाद थांबवण्यासाठी प्रयत्न केले याचा राग मनात धरून इंदापूर तालुक्यातील काही गुंडांनी करमाळा येथे जगदीश अग्रवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी अग्रवाल यांच्या हाताला व डोक्याला जबर मार लागला असून त्यांना करमाळा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक वाद हा इंदापूर येथील गुंडानी येऊन वाढवण्याचा प्रयत्न केल्याने शहरातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तो डाव हाणून पाडला व वाद होऊन दिला नाही. दोन्ही गटाला शांत केले व वाद निवळला. परंतु त्या ठिकाणी मध्यस्थी करत असताना अग्रवाल यांच्याबाबत इंदापूर येथील कार्यकर्त्याच्या डोक्यात राग बसलेला होता. त्याने तो राग काढण्यासाठी सोबत दोन कार गाड्या घेऊन आला व अगरवाल यांच्या हॉटेलमध्ये घुसून मारहाण करण्याचा केली.

यावेळी जगदीश अग्रवाल यांच्या समर्थकांसह परिसरातील लोक गोळा झाले व मारेकऱ्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. यावेळी हातातील लाकडी दांडके व कोयत्या सारख्या हत्यारांनी मारहाण केल्याने आग्रवाल हे गंभीर जखमी झाले आहेत. तर बाहेरून येऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र आले व तालुक्यातील एकी दाखवून दिली. अग्रवाल यांच्या भेटीगाठीसाठी रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते येत होते. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यातील देवानंद कोकाटे रा. सराटी ता. इंदापूर यासह चार ते पाच लोकांना ताब्यात घेतले व इतरांचा शोध सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.