करमाळासोलापूर जिल्हा

एका पदावरुन जिल्हाध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष आमनेसामने ; पाटलांच्या निर्णयाला काकांचे आव्हान

प्रतिनिधी – करमाळा


सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकारण भलते तापलेले असले तरी राष्ट्रवादीत सर्व काही अलबेल आहे असं बोललं जात आहे. पण राष्ट्रवादीच्या पडझडीच्या काळात खंबीरपणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत उभा राहिलेले सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे थेट प्रदेशाध्यक्ष यांच्या एका निर्णयाला थेट आव्हान देताना दिसून येत आहेत. त्यामुळे काका आणि राष्ट्रवादी यांचं सध्या जमत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बेधडक निर्णय घेताना पक्षाला काय वाटेल याची तमा सध्या काका करताना दिसून येत नाहीत.

यापूर्वीही बळीराम काका साठे हे राष्ट्रवादीच्या भूमिकेवर नाराज असल्याची दिसून आले होते. बळीराम काका पक्ष सोडून दुसऱ्या गटात जाणार यावर चर्चाही झाल्या होत्या. तर मध्यंतरी माजी आमदार दिलीप माने हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यापासून बळीराम साठे अत्यंत अस्वस्थ असल्याचे दिसून येत होते.

त्यामुळे साठे हे पक्ष सोडून जातात का काय अशाही चर्चांना उधाण आले होते. यासंदर्भात त्यांनी तालुका राष्ट्रवादीचीही बैठक घेतले होती व कार्यकर्त्यांची मते जाणुन घेतली होती. पण तेव्हा पासुन अंतर्गत धुसफुस सूरु होती पण उजेडात आलेली नव्हती.

करमाळा तालुक्यात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष वारे यांची नियुक्ती केलेली असताना त्यांचा पदभार अचानक काढून साठे यांच्या मर्जीतली हनुमंत मांढरे यांना सदरचा पदभार बळीराम साठी यांनी दिला होता. त्यानंतर संतोष वारे यांच्या समर्थकांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धाव घेतली.

यावेळी पाटील यांनी जिल्हाध्यक्ष यांनी दिलेल्या निवडीला स्थगीती दिली व संतोष वारे यांना पुन्हा अध्यक्षपदी नियुक्ती दिली. त्यानिर्णयाला आता काका साठे यांनी रद्द केल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे काकांनी थेट प्रदेशाध्यक्ष यांना त्यांच्या परस्पर हा निर्णय घेतल्याच्या चर्चा आहे. यामुळे आता तालुकाध्यक्ष पदावरुन वरिष्ठ पातळीवर रस्सीखेच जरी होणार नसली तरी काकांनी आपली नाराजी दाखवली आहे. आता चेंडु पुन्हा एकदा जयंत पाटलांच्या कोर्टात आहे.

पण या नाराजीवरुन राष्ट्रवादीत सर्वकाही अलबेल नसल्याचे दिसुन येते. पण यामुळे करमाळ्यात मात्र राष्ट्रवादीची चव जाताना दिसत आहे. तीन आठवड्यात तीन वेळा झालेल्या निवडीमुळे वरिष्ठाकडुनही पक्षात पोरखेळ सुरु असल्याचे दिसत आहे. यात आता तरी पक्षश्रेष्टी लक्ष घालुन सोक्षमोक्ष लावतील व निर्णय जाहीर करतील अशी आशा आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE