करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

वाशिंबेत जखमी मोराचे वनविभागाकडून रेस्क्यू शेतकरी नवनाथ भोईटे व पत्रकार सुयोग झोळ यांचा पुढाकार

प्रतिनिधी | करमाळा


वाशिंबे (ता. करमाळा) येथील पुणे–सोलापूर लोहमार्गालगत भोईटे वस्ती परिसरातील शेतात एक मोर जखमी अवस्थेत आढळून आला. ही बाब निदर्शनास येताच शेतकरी नवनाथ भोईटे यांनी तत्परता दाखवत स्थानिक पत्रकार सुयोग झोळ व वनविभागाशी संपर्क साधला आणि जखमी मोराची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जेऊर व मोहोळ वनविभागाचे अधिकारी अनिल राठोल यांनी तातडीने कार्यवाही केली. मोहोळ येथून वनविभागाचे वाहन व पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. वनकर्मचारी सुधाकर गुंड व सार्थक रंदवे यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी मोराचे रेस्क्यू केले.

रेस्क्यू केल्यानंतर जखमी मोराला पुढील उपचारांसाठी पुणे येथील बावधन वन्यजीव उपचार केंद्रात रवाना करण्यात आले. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे जखमी मोराला वेळेत मदत मिळाली.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE