करमाळासोलापूर जिल्हा

आमदार संजयमामा शिंदेंच्या पाठपुराव्याला यश ; दहिगाव उपसा सिंचन योजनेचे थकीत बील भरले

करमाळा समाचार 


करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदायिनी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी हंगामाचे थकीत वीज बिल 41 लाख 30 हजार नुकतेच महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे महामंडळाने भरले . त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेचा वीज पुरवठा खंडित होण्याची वेळ आत्ता येणार नसल्यामुळे शेतकरी आ. संजयमामा शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त करत आहेत .

संजयमामा शिंदे हे करमाळा मतदार संघाचे आमदार झाल्यापासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे हे चौथे आवर्तन सुरू आहे. ते आमदार होण्यापूर्वी थकित असलेले 74 लाख वीज बिल व त्यानंतर इतर तीन वीज बिले असे एकूण 2 कोटी 20 लाख रुपये वीज बिल आ. संजयमामा शिंदे यांनी कृष्णा खोरे महामंडळा कडे सतत पाठपुरावा करून आत्तापर्यंत भरले आहे.

सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीजबिल वसुली विषयी तगादा सुरू आहे .याचाच परिणाम म्हणून दहिगाव उपसा सिंचन योजनेचा वीज पुरवठा खंडित केला जाईल. अशी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये होती. परंतु तत्पूर्वीच चालू हंगामाचे असलेले 15 मार्च 2021 पर्यंतचे एकूण वीज बिल 41 लाख 30 हजार रुपये नुकतेच कृष्णा खोरे महामंडळाने भरल्यामुळे शेतकरीवर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE