नवीन मतदारांवर होतोय अन्याय – सतीश नीळ
करमाळा समाचार
ग्रामपंचायत निवडणूक कामी १७ नोव्हेंबर २०२० ची प्रसिद्ध झालेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात यावी अशी मागणी सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक सतीश नीळ यांनी राज्य निवडणूक आयोग यांच्या कडे इमेलद्वारे लेखी निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आपण काल २०/११/२०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशा प्रमाणे २५/९/२०२० रोजी पर्यंत ज्या मतदारांची नोंदणी झाली आहे. अशाच मतदारांचा यादीत समावेश करण्यात येईल व त्यांनाच होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार म्हणून व निवडणूक लढविण्यात येईल असे नमूद केले आहे. परंतु १७/११/२०२० रोजी पर्यंत नोंदणी झाली आहे ती मतदार यादी ग्राह्य धरण्यात यावी अन्यथा सदरील नवीन नोंदणी केली आहे अशा मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यांच्या वर अन्याय होणार आहे. त्यांचा न्यायिक हक्क मिळाला पाहिजे.
तसेच विधानसभा मतदार यादीत नोंदणी झाली आहे त्यांचाच ग्रामपंचायत निवडणुकीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून नवीन नोंदणी झालेल्या मतदारांना त्यांच्या हक्का पासून डावलले जात आहे.

१७/११/२०२० रोजी पर्यंत ज्या मतदारांची नोंदणी केली आहे तीच मतदार यादी येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत समाविष्ट करण्यात यावा अशीही विनंती केली आहे.