कल्याण डोंबिवली महानगर पालीकेचे उप आयुक्त रामदास कोकरे यांच्याकडुन पोमलवाडी पुलाची पाहणी
केतूर – अभय माने
रिटेवाडी गावचे सुपुत्र व कल्याण डोंबिवली महानगर पालीकेचे उपआयुक्त रामदास कोकरे यांनी सुरुवातीला लोकसहभागातून तयार झालेला व नंतर शासकीय निधीतून पूर्ण झालेल्या पोमलवाडी केत्तूर पुलाची पाहणी केली व त्यासंदर्भात माहिती जाणून घेतली तसेच पोमलवाडी ते चांडगाव नियोजीत पुलाच्या प्रस्तावासंदर्भात चर्चा केली व या भागात पर्यटन- वॉटर बोटींग , हॉटेलींग कसे वाढू शकते या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच या कामांसाठी प्रशासकीय पातळीवर लागेल ती मदत करू असे सांगितले.

साहेबांनी वेंगुर्ला नगर परिषद, माथेरान नगरपरिषद अशा बऱ्याच ठिकाणी कचरामुक्त व स्वच्छ शहर संकल्पना राबवून त्या यशश्वी करून दाखवल्या व त्यामुळे माथेरान येथे एका रस्त्याला साहेबांचे नाव देखील दिले आहे. तसेच देशपातळीवरचे अनेक पुरस्कार सोहबांना मिळाले आहेत. याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो अशी पोमलवाडी चे माजी सरपंच संग्राम पाटील म्हणाले.

कोकर यांच्या भेटीनिमित्त पोमलवाडीतील युवक मित्र व ग्रामस्थांच्या वतीने साहेबांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अभिजीत काळे, मंगेश कुंकले, दत्तात्रय काळे ,अक्षय पवार, बबलू काळे, संभाजी भोपते,हरिदास बाबर, विशाल काळे आदी उपस्थित होते.