करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

सासरच्या जाचाला कंटाळुन युवकाची आत्महत्या ; पत्नीसह चार जणांवर गुन्हा दाखल

करमाळा समाचार 

पत्नीला नांदायला न पाठवणे, जमीन नावावर करण्यासाठी तगादा लावणे, बांधकाम करून घेऊन मजुरी न दिल्याने तसेच सासरकडच्या मंडळींनी जाच केल्यामुळे सरपडोह च्या युवकाने घरातील पत्र्याच्या छताच्या लोखंडी नळीला ड्रिपच्या पाईपने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदरचा प्रकार रविवारी पहाटे उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलाच्या पत्नीसह सासरच्या मंडळींवर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत कांतीलाल घोगरे (वय ३२) रा. सरपडोह असे मयत पतीचे नाव आहे. तर याप्रकरणी सासरे नारायण विठ्ठल काळे, मेव्हणे लहू नारायण काळे, पत्नी शितल अभिजीत घोगरे व सासू (नाव माहीत नाही) यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अभिजित व शीतल यांचा विवाह २०१३ मध्ये झाला होता. सुरूवातीपासूनच संसारात दोघांचेही वाद-विवाद होत होते. मागील सहा महिन्यापासून शितल ही आपल्या माहेरी करंजे येथे आईवडिलांकडे राहण्यासाठी गेली होती. तेव्हापासून अभिजित हा तिला माघारी आणण्यासाठी प्रयत्न करत होता. अनेकदा सासरकडच्या मंडळींसोबत वादही झाले होते. त्याच दरम्यान सासरी अभिजित यांनी मजुरी काम करत असल्याने सासरकडील मंडळींचे बांधकाम केले होते त्याची मजुरी ही बाकी होती. शिवाय पत्नीला माहेरी घेऊन जाण्यासाठी बोलल्यानंतर मेहुणे व सासरकडच्या मंडळींनी जमीन नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. वारंवार यावरून वाद होत होता. अखेर शनिवारी वाद शिगेला पोहोचला व अभिजित यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. रात्री उशिरापर्यंत अभिजीत गावातील मंदिरा जवळ बसून होता.

त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला घरी येण्याचे सांगितले. त्यावेळी अभिजितने वडिलांना सासरच्या मंडळींना सोबत घडलेला प्रकार सांगितला. वडील घरी झोपण्यासाठी गेले व शेतीत काम करण्यासाठी पहाटे साडेचार वाजता उठल्यानंतर वडिलांनी अभिजीतच्या रूम मध्ये जाऊन पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पत्र्याच्या पाइपला ड्रिपच्या पाईपच्या सहाय्याने फाशी घेतल्याचे दिसुन आले. यावेळी शेजारी असलेल्या मोबाईल मध्ये याबाबतची ऑडिओ क्लिप वडिलांनी अभिजीतच्या मोबाईल मध्ये ऐकली व त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर सासू-सासऱ्यांचा मेहुणा व पत्नी च्या नावाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीतला एक मुलगा व मुलगी पत्नी व वडील असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक तानाजी पवार हे करीत आहेत.

Incident at Sarpadoh in Karmala taluka

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE