पावसाच्या पार्श्वभूमीवर नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाकडुन सुचना ; शेतकऱ्यांकडुन उपाययोजना
करमाळा समाचार
तालुका कृषी अधिकारी करमाळा, मकृअ जेऊर, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक कुगाव यांच्या आवाहनानुसार आता झालेल्या पावसामुळे हुमणीचे भुगेंरे मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने उस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे असे कळविले आहे.


त्यामुळे कृषी विभागाच्या आवाहनानुसार द्रोपदी शेतकरी गट कुगाव च्या वतीने हुमणीसाठी सभासदांच्या उस पिकात ठिक ठिकाणी हुमणी लाईट ट्रॅप लावण्यात आलेले आहेत. त्यावेळी द्रोपदी शेतकरी गटाचे सदस्य उपस्थित होते.
आपणही जागरुक राहुन आपापल्या परिसरात चौकशी करुन उपाययोजना करुन घ्याव्यात असे आवाहन करण्यात येत आहे