विधानसभा मतदारसंघासाठी सुनील बापू सावंत यांची मुलाखत
करमाळा
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून आज सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला येथे आयोजित केलेल्या इच्छुक मेळाव्यात सुनिल सावंत यांनी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या प्रत्येक विविध आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. यापुढे ही माझे काम चालूच राहणार आहे. मला खात्री आहे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील मलाच उमेदवारी देतील. करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील मराठा समाज, अठरापगड सर्व धर्मीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीन असे सावंत यांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक फारुक भाई जमादार, मराठा सेवा संघ ता. अध्यक्ष सचिन काळे , पै. दादासाहेब इंदलकर व मनोज बापू राखुंडे उपस्थित होते.