भारताचा डाव गडगडला पन्नास धावा गाठणेही झाले मुश्किल
करमाळा समाचार
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका सुरू झाली असून पहिल्या दिवशी पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळायला सुरुवात झाली. भारताकडून अतिशय खराब खेळाचे प्रदर्शन झाल्याचं दिसून आलं तब्बल सात खेळाडू शून्य धाव संख्येवर परतल्यामुळे अतिशय खराब परिस्थिती भारताची झाली आहे. केवळ 40 धावांसाठी 9 फलंदाज तंबूत परतले आहेत. सदरची पहिली टेस्ट ही बेंगळुरू येथे सुरू असून आज दुसरा दिवस आहे, पहिला दिवस पावसामुळे खेळ होऊ शकला नव्हता.

काल दिवसभर पाऊस पडल्यामुळे पीच मध्ये थोडासा ओलावा असल्याचे दिसत आहे. तर विदेशी खेळाडूंना साजेस असं मैदान सध्या दिसून येत आहे. सकाळपासून कसलाही उन पडले नसल्यामुळे लाईटच्या उजेडात सदरचा सामना सुरू करण्यात आला होता. त्यामुळे अजूनही पीच मध्ये ओलावा दिसून येत आहे. थोडेसे ऊन पडल्यानंतर खेळात सुधारणा होऊ शकते. परंतु तत्पूर्वीच भारताची फलंदाजी ढासळली असून केवळ 40 धावात 9 फलंदाज बाद झाले आहेत.

सलामीला आलेला रोहित शर्मा केवळ दोन धावा काढून बाद झाला. तर विराट पाठोपाठ तब्बल सात खेळाडू हे शून्य धावसंख्येवर बाद होऊन परतले आहेत. केवळ यशस्वी 13 व ऋषभ पंत 20 धावांची खेळी करू शकले, यावेळी इतर खेळाडूंना पाच धावसंख्येचा ही आकडा पार करता आलेला नाही. अतिशय खराब अशी फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली.
संघाच्या 9 धावा असताना रोहित शर्मा पुन्हा 9 धावांवर विराट कोहली, दहा धावांवर सरफराज खान, 31 धावा असताना यशस्वी जयस्वाल, 33 धावा असताना केल राहुल, 34 धावा असताना रवींद्र जडेजा, 34 धावांवर रविचंद्रन अश्विन, 39 धावांवर ऋषभ पंत, 40 धावांवर जसप्रित बुमरा असे फलंदाज बाद होत गेले. सध्या पिच वर मोहम्मद शिराज व कुलदीप यादव खेळताना दिसत आहेत.
यशस्वी जयस्वाल 13 धावा, रोहित शर्मा 2 धावा, विराट कोहली 0, सरफराज खान 0, ऋषभ पंत 20, के एल राहुल 0, रवींद्र जडेजा 0, रविचंद्रन अश्विन 0, कुलदीप यादव 2, बुमरा 0 अशी आतापर्यंतची खेळाडूंची धावसंख्या दिसून आली आहे.