नगरपरिषद शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव यांना राज्य सक्षम महिला पुरस्कार जाहीर
करमाळा समाचार
राज्य नपा व मनपा शिक्षक संघाचे पुरस्कार जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विविध शाळांच्या शिक्षकांची नावे आहेत. तर करमाळा येथील नगरपरिषद शाळा क्रमांक एक च्या मुख्याध्यापिका सुनंदा सुरेश जाधव यांना राज्य आदर्श सक्षम महिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार महाराष्ट्रातील आठ महिलांना देण्यात आला आहे. त्यामध्ये जाधव यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने देण्यात येणारे आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श प्रशासन अधिकारी, आदर्श महिला सक्षमीकरण,आदर्श तंत्र स्नेही व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार 2023_2024 जाहीर झाले.

आदर्श शिक्षक पुरस्कार
महेंद्रसिंग प्रतापसिंग चव्हाण नपा शाळा क्रमांक 6 खामगाव
रविंद्र देवीदास दाभाडे नपा शाळा क्रमांक 7 बुलढाणा
तंञस्नेही पुरस्कार
नंदकिशोर सुरेश पवार
नपा शाळा क्रमांक 10 खामगाव
आमिरखान अजमदखान
नपा शाळा मलकापूर जि.बुलढाणा
राज्य आदर्श सक्षम महिला पुरस्कार
सुनंदा सुरेश जाधव,
न. प. मुलांची शाळा क्रमांक एक करमाळा.
सदर पुरस्कार अर्जुन कोळी राज्य अध्यक्ष, ज्योत्स्ना भरडा उपाध्यक्ष, संजय आवळे उपाध्यक्ष, सुभाषराव कोल्हे कार्याध्यक्ष, किशोर पाडवी सरचिटणीस यांनी जाहीर केले आहेत.