E-Paperकरमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पावसामुळे परदेशी पक्षांचे वेळापत्रक कोलमडले ; फ्लेमिंगोचा परतीचा प्रवास टप्प्या टप्प्याने

जयराम माने :

केत्तूर ता.7 उजनी धरणाच्या क्षेत्रातील मुख्य आकर्षण असलेले अर्थात रोहित पक्ष्याने आपल्या परतीच्या प्रवासाला प्रारंभ केल्याची माहिती पक्षी अभ्यासकांकडून मिळाली आहे. सामान्यपणे हिवाळा सुरू झाला की म्हणजे नोव्हेंबर महिन्यात फ्लेमिंगो पक्षी थव्याने उजनी धरण परिसरात येऊन दाखला होतात. लांब पल्ल्याचा प्रवास करून धरणपरिसरात आल्यानंतर विस्तृत पाणलोट परिसरात अनुकूलता पाहून विविध ठिकाणी विखरून राहतात. तीन चार महिन्यांच्या वास्तव्यात उदरनिर्वाह करत हे पक्षी वावरतात. गटागटाने दिवसभरात उड्डाण घेत एकमेकांच्या संपर्कात राहून खाद्य मिळवत असतात.

स्थलांतर करुन येताना हे पक्षी आपल्या प्रौढावस्थेतील पिल्लांना सोबत घेऊन येतात. संपूर्ण करड्या रंगाचे व आकाराने लहान असलेली पिल्ले पालक पक्ष्यांपासून सहज ओळखता येते.ही पिल्ले सतत पालक पक्ष्यांचे आश्रय घेत व सुरक्षितता बाळगत कमाल क्षमतेने खाद्य मटकावण्यात सक्रिय असतात. धरणाच्या पाण्यात आढळणाऱ्या आटोलिया या विशिष्ट तांबड्या शेवाळाच्या सेवनाने या पिल्लांना गुलाबी व शेंदरी रंगाचे रूप धारण होते. तीनचार महिन्यातील वास्तव्यानंतर पिल्ले आकाराने मोठी होतात नजाकतदार रंग प्राप्त झाल्यावर पालक पक्ष्यांपासून विलग होऊन स्वतंत्र जीवन जगण्यात तत्पर होतात. नंतर पावसाळ्याचा अंदाज घेत परतीच्या प्रवासाला लागतात.

पळसदेव परिसर बनले फ्लेमिंगो सिटी
सामान्यपणे दरवर्षी परतीच्या प्रवासाच्या पूर्वी संपूर्ण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विखरून असलेले शेकडो फ्लेमिंगो मे महिन्यात पळसदेव परिसरात जमतात. पावसाळ्याचा अंदाज घेत या ठिकाणी हे पाहुणे पक्षी चरण्यात मग्न असतात. मे महिन्यात खालावलेल्या पाण्याच्या पातळीमुळे हे ठिकाण या पक्ष्यांच्या उदरनिर्वाहासाठी पोषक ठरते. पाण्यापासून मुक्त झालेल्या या परिसरात फ्लेमिंगोंचे अनेक समूह महिनाभर तळ ठोकून राहतात. या कारणामुळे हा परिसर फ्लेमिंगो ने गजबजतो व पक्षीनिरीक्षकांना ‘फ्लेमिंगो सिटी’ अवतरल्याची प्रचीती मिळते.

” यावर्षी फ्लेमिंगोच्या आगमनाच्या दिवसांत म्हणजे हिवाळ्यात निर्माण झालेल्या वातावरणातील बदल त्यांच्या प्रवासाला बाधा ठरली होती. ऐन दिवाळीत पडत असलेल्या धोधो पावसामुळे हे पाहुणे पक्षी जरा उशीराने व कांहीं प्रमाणात कमी संख्येने आले होते. या वर्षी पाऊस लांबल्याने या पक्ष्यांच्या परतीचा प्रवास सुध्दा रखडला आहे. वर्षभराच्या वातावरणातील अनिश्चितेमुळे हे नजाकदार विहंग सुद्धा त्रस्त झाले आहेत.
– – डॉ.अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक

” वारंवार बदलणान्या हवामानाचा पशुपक्ष्यांच्या आगमनावर विपरीत परिणाम झाला होता.पर्यायाने यावर्षी उजनीवर दाखल होणाऱ्या पक्षांचे संकेत कमालीची घट झाली होती त्यातच मुख्य आकर्षण असणारे फ्लेमिंगो ही कमी प्रमाणात आली होते जणू काही उजनीवर पक्ष्यांनी यावर्षी पाठच केली होती त्यामुळे पक्षीप्रेमी तशीच पक्षी निरीक्षकांमध्ये निरोधकाचे वातावरण होते.उशिराने आलेले फ्लेमिंगो यावर्षी आता परतीच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.
कल्याणराव साळुंके पक्षीप्रेमी, करमाळा

‘ उजनी धरणातील पाणीसाठा प्रचंड प्रमाणात कमीझाला आहे. त्यात जून महिन्याच्या सुरवातीला चालू होणार पाऊस जुलै महिन्यात पडण्यास सुरवात झाल्याने उजनी जलाशयात आलेले फ्लेमिंगो पक्षी परतीच्या प्रवासाला निघण्यासाठी तयारीत झाल्याचे दिसत आहेत.
राहुल इरावडे ,पक्षीप्रेमी केतूर

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE