जाधव यांचे बीज प्रक्रिया या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन ; कृषी संजीवनी सप्ताह
करमाळा सामाचार
दिनांक 22 जून 2019 रोजी मौजे विहाळ येथे नाळे वस्ती या ठिकाणी संत सावता माळी सभागृह येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत तालुका कृषी अधिकारी करमाळा अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी केतुर यांच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी केतुर श्री देविदास चौधरी कृषी सहाय्यक उमाकांत जाधव ग्रामपंचायत सदस्य श्री मोहनराव मारकड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विकास नाळे व विहाळ मधील शेतकरी बांधव उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री देविदास चौधरी मंडळ कृषी अधिकारी केदुर यांनी केले त्यांनी प्रास्ताविकामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.

या सप्ताहामध्ये विविध घटकांची माहिती देण्यात येते यामध्ये बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य आंतरपीक तंत्रज्ञान विकेल ते पिकेल व मंडळा अंतर्गत येणाऱ्या गावातील महत्त्वाच्या पिकांची कीड रोग नियंत्रण उपायोजना इत्यादी बाबत या कृषी संजीवनी सप्ताहामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे आज या ठिकाणी बीज प्रक्रिया याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे.
श्री उमाकांत जाधव यांनी बीज प्रक्रिया या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी कोणत्या पिकाला कोणते बुरशीनाशक कीटकनाशक आणि जैविक खत बीजप्रक्रियेसाठी वापरायचे त्याचे प्रमाण व पद्धत शेतकरी बंधूंना प्रात्यक्षिक करून समजावून सांगितले. बीज प्रक्रिया करून आपण पेरणी केली केली तर खालील प्रमाणे आपल्याला त्याचे फायदे होतात 1.पेरलेल्या बियाण्याची आणि लागवड केलेल्या रोपांची जमिनीमधून होणाऱ्या रोगांपासून व किडींपासून संरक्षण होते. 2.बियाणे चांगल्या पद्धतीने रुजते. 3.पिक जोमदार व एक सारखे वाढते.4. द्विदल पिकांमध्ये गाठी तयार होऊन नत्र स्थिर होते.5. पाऊस कमी जास्त पडला तरी आपली पीक चांगले आणि निरोगी येते.
बीजप्रक्रियेसाठी अत्यंत कमी खर्च आणि वेळ लागतो यामुळे शेतकरी बांधवांनी बीजप्रक्रिया करूनच बियांची पेरणी करावी असे आवाहन जाधव यांनी केले यानंतर ग्रामपंचायत सदस्य मोहन मारकड यांनी बीजप्रक्रिये बाबत मार्गदर्शन केले आणि आभार मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास नाळे शिवाजी नाळे गणेश चोपडे यांनी परिश्रम घेतले