करमाळासोलापूर जिल्हा

ननवरे नंतर सभापतीपदासाठी दोन पैलवानांची नावे चर्चेत

करमाळा समाचार 

करमाळा पंचायत समितीचे सभापती गहीनीनाथ ननवरे यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. पण हे पूर्वनियोजित असल्याने या मधून कोणत्याही प्रकारची नाराजीचा विषय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण ननवरे नंतर आता पुढे कोण असा प्रश्न सध्या जोर धरत आहे. त्यामध्ये दोन पैलवानांची नावे समोर येत आहेत.

पंचायत समितीवर माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यात आली होती. सुरुवातीला सभापती पदी शेखर गाडे तर उपसभापती गहीनाथ ननवरे यांची वर्णी लागली होती. दरम्यानच्या काळात अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे बदल करण्याची समोर आली. त्यानंतर बदल करून उपसभापती असलेले गहिनीनाथ ननवरे यांनाच सभापतीपदी तर पैलवान दत्तात्रय सरडे यांची उपसभापती वर्णी लागली होती.

त्यावेळीही सभापतीपदासाठी डबल उपमहाराष्ट्र केसरी पंचायत समिती सदस्य अतुल पाटील यांच्या नावाची सभापतीपदासाठी चर्चा सुरू होत्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा सभापतिपदासाठी अतुल पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहेत. तसेच उपसभापती असलेले दत्तात्रय सरडे यांच्याही नावाची चर्चा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या दोन पैलवान पैकी एकाची वर्णी सभापतिपदी लागणे निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE