राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्षपदी जमादार ; शहराध्यक्षपदी सय्यद यांची निवड
करमाळा –
आज आमदार संजयमामा शिंदे यांचे निवासस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीच्या निवडी झाल्या असुन या मध्ये सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पदी आशपाक फारूक जमादार यांची तर करमाळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या शहर अध्यक्ष पदी तौसिफ बापु सय्यद यांची निवड झाली असुन सदर निवडीचे पत्र आमदार संजय मामा शिंदे यांचे हस्ते देण्यात आले.

यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील, माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश पाटील, कुर्डुवाडी नगरपालिकेचे नगरसेवक आनंद टोणपे, बोरगाव ग्रामपंचायत चे सरपंच विनय ननवरे, राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी सेल चे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णकांत माळी तसेच कुर्डुवाडी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष आमीर मुलाणी आदी जण उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील म्हणाले की, आजच्या या निवडी आमदार संजय मामा शिंदे यांचे आदेशानुसार झाले असुन देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्व सामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी काम करावे असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोरगाव चे सरपंच विनय ननवरे यांनी आभार मानले.
