करमाळासोलापूर जिल्हा

आपले दुर्लक्ष एखाद्याच्या जीवावर बेतु शकते ; मुलांच्या वेगावर आपले लक्ष आहे का ?

करमाळा समाचार 

आजकाल मुलांना शाळा तसेच शिकवणीला जाण्यासाठी मोटारवाहन देणे नित्याचे झाले आहे. त्यात पालकांना काहीच विशेष वाटत नाही. पण कमी वयात मिळालेली ही साधने स्वतःसह इतरांच्या जिवाला धोकादायक होत आहेत. हे त्यांच्या पालकांना लक्षात येत नाही. त्यामुळे मोटरसायकल देताय तर मुलांवर लक्ष ही द्या ! मुलाच्या गाडीचा वेग तर वाढत नाही ना ? सावध व्हा!!

दिवसभरात मुलांच्या शाळा व शिकवणी कमी वेळेची धावपळ, वेगात जाण्याची ओढ आणि एकमेकात सुरू असलेली शर्यत यामुळे मुलांच्या गाड्यांचा वेग वाढत चाललेला आहे. दोन दिवसांपूर्वी महात्मा गांधी शाळेच्या एका विद्यार्थिनीला अशाच एका वेगवान शालेय विद्यार्थ्यांच्या गाडीने धडक बसली. तिच्या चेहर्‍यावर मोठी जखम झाली असून थोडक्यात तिचा डोळा ठबचावला. तिला शेजारीच घोलप हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. सुदैवाने जास्त मोठी गंभीर जखम नसल्याने मुलगी सुखरूप आहे. पण आज त्या मुलीला काय झाले असते तर नेमके जबाबदार कोण ? वेग वेगात गाडी चालवणारा मुलगा की मुलाला मोटरसायकल देऊन दुर्लक्ष करणारे पालक. एकदा घडलेली चूक पुन्हा भरून निघत नाही त्यामुळे आपल्या मुलांना मोटरसायकल देताना त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

मोटर सायकल ऐवजी सायकलचा पर्याय..
सध्या वेळेवर पोहोचण्यासाठी मोटरसायकल चा पर्याय निवडला जातो. परंतु त्याचे अनेक धोकेही आहेत. शिवाय अल्पवयीन असल्याने त्यांच्याकडे लायसन्ससही नाही अशात अडचणीत सापडण्याची शक्यता जास्त आहे. त्या पेक्षा पालकांनी आपल्या मुलांना शिकवणी तसेच शाळेवर व्यवस्थित पोहोचण्यासाठी सायकलचा पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

रोडरोमिओंचा ही भलताच त्रास..
शाळा तसेच शिकवणी मार्गावर शिक्षक घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह उडाणटप्पू व रोड रोमिओ यांचीही येणे-जाणे असते. स्टाईल मारण्याच्या नादात गाडीचा वेगही वाढतो. त्यातूनच अपघात घडतात. त्यामुळे विनाकारण मोटरसायकल घेऊन आपला मुलगा कुठे जातो. याकडेही लक्ष दिले तर अशा घटनांना आळा बसेल. शिवाय पोलिसांनी अशा रोडरोमियोंना आवर घालण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE