जिंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या धुमधडाक्यात संपन्न
करमाळा प्रतिनिधी:- दिलीप दंगाणे
जिंती तालुका करमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन जि, प , सदस्य सौ सवितादेवी राजेभोसले व जिंती गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौ सुनीताताई ओंभासे- पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नारळ वाढवण्याचा कार्यक्रम जिंती येथील वृद्ध नागरिक रंगनाथ नाना भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एस यु राजे भोसले हायस्कूल जिंती येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी रांगोळी स्पर्धेचे आयोजन तसेच लहान मुला मुलींसाठी संगीत खुर्ची तर मुलींसाठी चमचा लिंबू अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम चार क्रमांकाला ट्रॉफी शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. दुपारी महा प्रसादाचे आयोजन शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता तिरंगा झांज पथकाच्या वाद्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांच्या प्रतिमेचे मिरवणूक जिंती नगरीतून काढण्यात येणार आहे.
प्रसंगी लहान मुला मुलींची छत्रपती शिवाजी महाराजांवरती केलेली भाषणे या कार्यक्रमात आकर्षक ठरली हा कार्यक्रम आयोजित शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिंती ग्रामपंचायतचे सर्व आजी-माजी सदस्य उपसरपंच रमेश धेंडे, माजी सरपंच संग्राम राजे भोसले, पृथ्वीराज राजे भोसले, छगन भोसले, राजेंद्र भोसले उर्फ बंडू पाटील, अमर धेंडे, शाम ओंभासे, नानासाहेब वाघमोडे, गणेश घोरपडे, सागरभाऊ पोटे, नितेश उर्फ भाऊ पवार, निलेश जाधव, अजिंक्य वाघमोडे , सोनबा कोकणे महाराज, अतुल रणदिवे, रियाज तांबोळी, निलेश वारगड, मोहित ओंभासे, गणेश ओंभासे, हरिभाऊ वारगड , नंदकुमार भोसले मेजर, विनोद शेलार, सौरव शेलार उपस्थीत होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवप्रेमी प्रतिष्ठान अध्यक्ष सागर भोसले, उपाध्यक्ष शिवभक्त कुमार दादा राऊत, संजय भोसले, शुभम वारगड, सिकिंदर ईमाम मुलाणी, शुभम भोसले, राजू मुलाणी, गजानन पोटे, आयुब मुलानी, हनुमंत भोसले, कृष्णा देशमाने, आयाँन तांबोळी, समाधान भोसले यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे एस यु राजेभोसले हायस्कूलचे रामहरी झांजूणे सर यांनी केले तर या कार्यक्रमाला जिंती आणि परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.