पत्रकार शितलकुमार मोटे जोशाबा पुरस्काराने सन्मानित
करमाळा
पत्रकार शितलकुमार मोटे यांना सन 2024 चा जोशाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व बहुजन समाज परिषदेच्या वतीने आदर्श पत्रकार ( जोशाबा पुरस्कार दर्पणकार पुरस्कार ) शिवसेना नेते अरविंद पवार, दिलीप देवकुळे, बालाजी लोंढे ( मुख्यधिकारी करमाळा नगरपरिषद),यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. प्रा. राजेंद्र दास हे होते.
तर या कार्यक्रमासाठी ,शिवसेना नेते अरविंद पवार,माळशिरस सरपंच माऊली कांबळे ( तृतीय पंथी सरपंच),दिलीप देवकुळे ( डी.एस.एस प्रदेशाध्यक्ष), बालाजी लोंढे ( मुख्याधिकारी करमाळा नगरपालिका ) संतोष लोंढे ( सरपंच ग्रामपंचायत चिंचोली),माऊली पाटोळे हे उपस्थित होते. कै. विठ्ठलराव शिंदे सभागृह पंचायत समिती कुर्डुवाडी येथे कार्यक्रम पार पडला. बाळासाहेब देवकुळे ( संस्थापक अध्यक्ष जोशाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्था चिंचोली महाराष्ट्र) यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश आतकर यांनी केले तर आभार बाळासाहेब देवकुळे यांनी मानले.