करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

karmala BREAKING NEWS – लाचलुचपत विभागाची अधिकाऱ्यावर कारवाई

करमाळा समाचार 

करमाळा येथे सोलापूर येथील लाचलुचपत विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये केतुर या ठिकाणी मंडळ अधिकारी म्हणून काम करत असलेल्या एका अधिकाऱ्यास ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचं काम सुरू असून लवकरच या संदर्भात पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती मिळत आहे.

सदरची कारवाई सोलापूर येथील लाचलुचपत विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात नेमकं कशामुळे सदर कारवाई झाली अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कुणबी दाखलेच्या कारणाने सदर कारवाई झाली असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये संबंधित सर्कल यांनी पैशाची मागणी केल्याने कारवाई झाल्याचे समजते आहे. केत्तुर मंडळ अधिकारी शंकर केकान असे त्यांचे नाव आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE