Karmala – BREAKING NEWS – खडकपुऱ्यावर फटाक्यांची आतिषबाजी ; भगत कुटुंबात आनंदाचे वातावरण
करमाळा समाचार
दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल लागला व त्यामध्ये करमाळ्यातील बांधकाम ठेकेदार किशोर भगत यांचे चिरंजीव प्रतीक भगत यांचा उत्तीर्ण म्हणून निकाल लागला आहे. यामुळे करमाळ्यात जल्लोष साजरा करण्यात आला आहे. नुकताच लागलेल्या निकालात प्रतीक भगत यांनी बाजी मारली असून त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.

मागील चार वर्षांपूर्वी ते पुणे येथे अभ्यासाच्या निमित्ताने गेले. यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभाग नोंदवला. मुख्य परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी बाजी मारली आहे. उपनिरीक्षकपदी निवड झाल्यामुळे त्यांचा करमाळा शहरात मिरवणूक काढून आनंद व्यक्त करण्यात आला. कोरोना काळात त्यांनी काहीतरी होण्याचे ठरवले व स्पर्धा परीक्षेकडे वळाले. 2022 मध्ये झालेला परीक्षेचा निकाल आत्ता जाहीर झाला आहे. दोन वर्षांनी का होईना आनंदाची बातमी मिळाल्याने भगत कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
