करमाळा पोलिसांची धमाकेदार कामगिरी ; एक वर्षापासुन फरार आरोपीला अटक
करमाळा समाचार
दिनांक 11 रोजी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना गोपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे करमाळा पोलीस ठाणे कडील आर्म एक्ट मधील एक वर्षापासून फरार असलेला आरोपी हिसरे गावात आला असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलीस निरीक्षक कोकणे यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने,पोलीस हेडकॉन्स्टेबल देवकर, पोलीस नाईक हराळे ,पोलीस कॉन्स्टेबल काजी, ढवळे , महिला पोलिस कॉन्स्टेबल आनारसे यांचे पथक हिसरे गावात रवाना केले.
वरील पथकाने हिसरे गावात सापळा रचून करमाळा पोलीस ठाणे कडील आर्म ॲक्ट मधील फरारी आरोपी नामे नाना उत्तम काळे वय 42 वर्षे राहणार हिसरे तालुका करमाळा यांना अटक केली.

सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक झेंडे साहेब,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे साहेब, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणे कडील डीबी पथकाने केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तळपे हे करत आहेत.