मराठ्यांवर लाठीचार्जचा करमाळ्यात निषेध ; ६ सप्टेंबरला निषेध मोर्चा
करमाळा समाचार -संजय साखरे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवली सराटा ता. अंबड जि. जालना येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर काल पोलिसांनी निर्दयीपणे लाठीचार्ज करुन अत्याचार केला. यामध्ये अनेक महिला व पुरुष आंदोलक मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत.

या घटनेचा निषेध म्हणून करमाळा तालुका मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज व बहुजन बांधव यांच्या वतीने बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता महात्मा गांधी पुतळा पोथरे नाका येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून करमाळा तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात दिली आहे.

यासंबंधीचे निवेदन आज मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक करमाळा व तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. आज सकाळी शेकडो मराठा बांधवांच्या उपस्थीतीत हे निवेदन देण्यात आले.