करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा समाचार ने दिलेले वृत्त खरे ठरले ; नाशीकच्या चव्हाणचा खुन अनैतीक संबधातुन !

करमाळा समाचार

आई सोबत अनैतीक संबंध असल्याची कुणकुण लागल्यामुळे त्यामधुन झालेल्या वादाचे रूपांतर खुनापर्यंत जाऊन पोहोचले व येवला तालुक्यातील एकाचा खुन करुन त्याला करमाळा तालुक्यात आणुन टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यातील एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनिल घाडगे असे संशयीताचे नाव आहे तर भाऊ व बायको सोबत त्याने हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.

काल मांगी रस्ताला मिळालेला मृतदेह हा श्रावण रघुनाथ चव्हाण वय ४० रा. अडसुरेगाव ता. येवला जिल्हा नाशीक याचा आहे. तर सुनिल घाडगे व त्याचा भाऊ व पत्नीवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://karmalasamachar.com/the-deceased-was-identified-there-was-an-attempt-to-kill-and-destroy-the-evidence/

दिनांक 3 जून पासून मिसिंग असलेला भावाला शोधण्यासाठी चव्हाण कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस जात तक्रार दाखल केली होती. त्याचा शोध पोलीस घेत होते. दरम्यान काल अचानक मांगी येथे जळलेल्या अवस्थेत मृत शरीत मिळाले होते. तर गाडी क्रमांकावरून ती कुणाची आहे याचा शोध लागला. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे सूत्र वेगात फिरवले. यावेळी सदरचा खून हा गावातीलच सुनील घाडगे, भाऊ व पत्नीच्या मदतीने केल्याचे संशय आहे. याप्रकरणी फिर्यादीवरुन तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सुनिल यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदरची कामगिरी उपविभागीय अधिकारी अजित पाटील , पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक मिठु जगदाळे, सागर कुंजीर, पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, अजित उबाळे, पोलीस कॉन्स्टेबल तोफिक काझी, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे यांनी केली आहे. रमिझ शेख व दत्तात्रय गोडगे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE