पंढरपुर निवडणुका नंतर करमाळा दौरा ; आ.संजयमामा शिंदे कोरोना बाधीत
प्रतिनिधी करमाळा
करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून सध्या पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत उत्तम असून नागरिकांनी काळजी करू नये असे आवाहन आ. संजयमामा शिंदे यांनी केले आहे .

दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी आमदार शिंदे व त्यांचे स्वीय सहाय्यक श्री प्रवीण शिंदे यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या दरम्यानच्या काळात त्यांच्या संपर्कात जे जे आलेले आहेत त्यांनी स्वतःहून क्वारंटाईन राहावे. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन आ. संजयमामा शिंदे यांनी केले आहे.

शिवाय संजयमामा पंढरपूर निवडणुकाच्या निमित्ताने तिकडे होते तर नुकतेच ते जेऊर येथील कोविड केअर सेंटरच्या कामानिमित्त जेऊर येथेही दौरा झाला यावेळी अनेक जण संपर्कात आले होते.
तालुक्यातील नागरिकांनी मास्कचा वापर करावा , सुरक्षित अंतर पाळावे , अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे .