करमाळ्याचा बारावीचा एकूण निकाल ९४.६५ टक्के निकाल
करमाळा समाचार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज सोमवारी (दि. ५) मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यातील एकूण उत्तीर्ण सरासरी टक्केवारी ९४.६५ टक्के इतकी जाहीर झाली आहे.

तालुक्यातून बारावी परीक्षेसाठी एकूण २ हजार २४२ जणांची नोंदणी झाली होती. त्यातील २ हजार २२८ जणांनी परीक्षा दिली. ऑनलाईन जाहीर झालेल्या निकालानुसार २ हजार १०९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये विशेष गुणवत्ता धारक श्रेणीत १५१, ग्रेड एक श्रेणीत ७६४ ,ग्रेड दोन श्रेणीत ९७६, पास श्रेणीत २१८ अशाप्रकारे उत्तीर्ण परीक्षार्थींचा समावेश आहे. महात्मा गांधी विद्यालय करमाळा, नूतन विद्यालय केम, साडे ज्युनियर कॉलेज, दत्तकला आयडीयल स्कूल या विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

संकेतस्थळावर जाहीर एकूण निकालामध्ये तालुक्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,करमाळा ( ८९.९७ टक्के), भारत हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज, जेऊर ( ९९.४८ टक्के), श्री उत्तरेश्वर महाविद्यालय, केम (८४.५२ टक्के), महात्मा गांधी ज्यूनियर कॉलेज, करमाळा (१०० टक्के), नेताजी सुभाष ज्यूनियर कॉलेज, केतूर नं.२ (९६.६६ टक्के), श्री आदिनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेलगाव (८७.५०टक्के), कण्वमुनी विद्यालय व ज्यूनियर कॉलेज, कंदर (८७.५० टक्के), मच्छिंद्र नुस्ते विद्यालय व ज्यूनियर कॉलेज, कविटगाव (९०.३२ टक्के), त्रिमुर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्यूनियर कॉलेज, टाकळी (रा) (८२.९२ टक्के), नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम ( १०० टक्के), एसकेकेएचएस, करमाळा ( टक्के),साडे ज्युनियर (१०० टक्के), दत्तकला आयडीयल स्कूल (१०० टक्के), भारत एचएससीएच हायस्कूल जेऊर (५० टक्के), कृष्णाई इंटरनॅशनल इंग्लिश मेडिअम स्कूल (९९.३६ टक्के) अशाप्रकारे निकाल लागला आहे.