वरकुटे येथील विश्वनाथराव जगताप यांचे निधन ; आज सकाळी अंत्यविधी
करमाळा –
कै. विश्वनाथराव रामचंद्र जगताप, रा. वरकुटे ( मूर्तिचे ) ता. करमाळा जि. सोलापूर येथील प्रगतशील बागायतदार यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दुखःद निधन झालेले आहे. त्यांचा अंतविधी
आज दि.२९/१२/२४ रविवार रोजी सकाळी 10 वा वरकुटे ता. करमाळा जि. सोलापूर येथे होणार आहे.
पंचक्रोशीत तसेच औरंगाबाद व ठाणे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जगताप परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते औरंगाबाद येथील नामांकित मेडिकल व्यावसायिक श्री. दादासाहेब व धनंजय जगताप तसेच ठाणे येथे कार्यरत असणारे सहायक आयुक्त श्री. गौतम जगताप यांचे वडील आहेत. तसेच मुंबई येथे गोरेगाव पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुधीर चव्हाण यांचे आजोबा आहेत.