करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

लोखंडी पाईप पडल्याने मजुराचा मृत्यु ; एकावर गुन्हा दाखल

करमाळा समाचार

तालुक्यातील नेरले येथे इलेक्ट्रिक मोटर काढण्याकरता गेलेल्या मजुराचा लोखंडी कप्पीचा पाईप डोक्यात लागून जबर जखमी होऊन अपघात झाला. सदरच्या मजुराला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरने मृत्यू घोषित केले. तर कामावर घेऊन जात असताना सुरक्षितता न वापरल्याने घेऊन जाणाऱ्या ठेकेदारा विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी करमाळा पोलिसात सौदागर गोडसे यांनी फिर्याद दिली आहे. तर अण्णासाहेब हनुमंत गवळी यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावातीलच बनसोडे यांच्या शेतातील बोर मधील इलेक्ट्रिक मोटर बंद पडल्याने त्याने गावातील अण्णासाहेब गवळी यांची कप्पी सांगितली होती. त्यांनी दोन दिवस इलेक्ट्रिक कप्पीच्या साह्याने बंद पडलेली मोटर काढण्याकरता प्रयत्न करत होते. परंतु मोटर बाहेर निघत नव्हती. त्यानंतर 29 रोजी सायंकाळी सात वाजता अण्णासाहेब गवळी यांनी मयत भीमराव गोडसे यांना मजुरीसाठी घेऊन गेले होते.

ads

त्यावेळी सदरची लोखंडी कप्पीचा पाईप डोक्यात पडल्याने गोडसे यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू जबाबदार म्हणून गवळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE