स्व. आ. गणपतराव देशमुखांची इच्छा त्यांच्या पश्चात होणार पुर्ण
करमाळा समाचार
सर्व समाजांमधील विविध अडीअडचणी समाज माध्यमात मांडण्यासाठी आदिवासी धनगर या साहित्य संमेलनाची सुरुवात मागील चार वर्षांपूर्वी करण्यात आली होती. सांगोल्याचे आमदार स्व. गणपतराव देशमुख यांची इच्छा होती हे अधिवेशन सांगोल्यात व्हावे यातून समाजाला व तालुक्यातील लोकांना विविध गोष्टी कळाव्यात पण ते हयात असताना हे अधिवेशन झाले नव्हते. पण त्यांच्या पश्चात आता ह्या अधिवेशनाची नियोजन करण्यात आले असून 23 व 24 जुलै रोजी हे अधिवेशन सांगोला येथे होत आहे.

आदिवासी धनगर जरी या संमेलनाला नाव असेल तरीही ते केवळ फक्त आदिवासी किंवा धनगर समाजासाठी नसून सर्व जाती धर्मांसाठी हे अधिवेशन सर्व साहित्यांचा साहित्यिकांसाठी खुले राहणार आहे व आजपर्यंतच्या झालेल्या तीन अधिवेशनात हे अधिवेशन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते. यामुळे याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. सदरच्या साहित्य संमेलनाला जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक उपस्थित राहून याचा आस्वाद घेतात. सदरचे अधिवेशन हे तीन दिवस चालणार असून सांगोला येथे आयोजन करण्यात आले आहे.

या आयोजनासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीची नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. त्याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी याबाबत चर्चा सुरू आहे अशी माहिती कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी दिली आहे.
यावेळी आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. अभिमन्यू टकले, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, धनगर धर्म पिठाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कोळेकर, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब टकले, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, तात्या काळे उपस्थित होते.