पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील यांचे ‘विठ्ठलाचा लळा’ चा शुभारंभ
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील पोथरे येथील पोलीस पाटील व तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील यांचे गीत, गायन व संगीतबध्द केलेले ‘विठ्ठलाचा लळा‘ हे विठ्ठल भक्तीगीत आज आषाढी एकादशी निमित्त swarsandip या you tube चॅनेल वर प्रसारीत करण्यात आले.

हे प्रसारण राष्ट्रवादीकाँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष वारे, मकाईचे माजी संचालक हरिभाऊ झिंजाडे, आदर्श शिक्षक विक्रम राऊत यांचे हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम पोथरे येथील शनीभक्त निवास येथे करण्यात आले.

या गीतांची शब्दरचना, संगीत, गायक संदिप पाटील यांचे आहे तर संगीत संयोजन, प्रफुल्ल दामोदरे, कृष्णा जाधव, तौफिक पठाण यांनी केले आहे.
यावेळी पत्रकार विशाल (नाना)घोलप, पोलीस काॅन्स्टेबल
सुनील गवारे, धनंजय काळे, रंजित(दादा)पाटील, दत्ता(महाराज)नंदरगे, आबासो शिंदे, अशोक दळवी, अशोक ढवळे, गोविंद(काका) कुलकर्णी, राजू शिंदे, देवराव शिंदे, देविदास (तात्या) जाधव मुरलीधर झिंजाडे व अन्य वारकरी उपस्थित होते.