करमाळासोलापूर जिल्हा

लसीकरणासाठी जाण्यासाठी नगरपरिषदेची नवी नियमावली ; प्रत्येक दिवशीचा फेरा वाचणार

करमाळा समाचार 

करमाळा शहरातील 60 वर्षावरील नागरिकांना प्राधान्यानै लसिकरण देणे विषयी सूचना केल्या आहेत.त्याकरीता लसीकरणाकरिता स्लिप वाटप केली जाणार आहेत.या स्लिप करमाळा नगरपरिषदेने केल्यावर ज्यांच्याकडे स्लिप आहे त्यांनाच काँटेज हॉस्पीटल येथे लस उपलब्ध होईल त्या दिवशी स्लीप नंबर नुसारच लस दिली जाणार आहे.

उदा.60 वर्षा वरील 1ते 2000 अशा नोंदणि झालेल्यांना नंबर टाकून स्लिप देण्यात आल्यावर
काँटेज येथे ज्या दिवशी लस उपवब्ध होईल त्या संख्ये ऐवढी यादी व क्रमांक घोषीत करण्यात येतील
उदा.200 लसीचे डोस उपलब्ध झाल्यास 1-200 अशा प्रथम नोंदणी झालेल्या वयस्कर व्यक्ती ची यादी काँटेज बाहेर बोर्डवर लावण्यात येईल ज्यांच्याकडे 1-200 नंबरचे टोकण आहे अशा व्यक्तीना काँटेजला लस टोकण दाखवून मिळणार आहे.

60 वर्षे वरील नागरिकांना लसिकरणासाठी स्लिप देण्यासाठी सूचना-

1.ठिकाण-महादेव मंदीर खौलेश्वरमंदीरासमोर
मा.जयवंतराव जगताप बहुउद्देशिय सभागृह किल्ला विभाग मारूती मंदीरा जवळ

2.दिनांक-25/5/2021 वार मंगळवार

3.वेळ-सकाळी 7 वाजता

4….प्रथम डोस करीता 60 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय (1961 च्या आधीची जन्म तारीख असलेले म्हणजे 1961,1960,1959…….1922,1921) असलेल्या करमाळा शहरातील नागरिकांस स्लीप दिली जाणार आहे.

5… क्रुपया 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांना स्लीपचे वाटप होणार नाही.

6.सदर स्लिप आसलेल्यांना कॉटेज हॉस्पीटल येथे लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे स्लीप नंबर (टोकन नंबर)नुसार लसीकरण केले जाईल.

7.आवश्यक कागदपञे-आधार कार्ड/निवडणूक ओळख पञ ज्यावार जन्मतारीख असेल व करमाळा शहरात राहत असल्याबाबत पत्ता असेल

8.स्लिप करीता येणारे यांनी डबल मास्क वापरणे वा सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक आहे.

9.करमाळा शहराव्यतिरिक्त नागरीकांना स्लिप वाटप होणार नाही.

10.सदर स्लीप नंबर नुसार कॉटेज येथे लस उपलब्ध झाल्यानंतर नागरीकांनी लसीकरणासाठी उपस्थित रहावे.

11.ग्रामिण भागातील नागरीक वा ग्रामीण भागातील शिक्षक यांना संबधीत गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसिकरण केले जाईल त्यांनी करमाळा शहरातील नोंदणी कैंद्रात येवू नये .ही विशेष व नम्र सूचना.करमाळा शहराव्यतिरिक्त कोणत्याही नागरीकास सदर स्लिप देण्यात येणार नाही.

वरील सुचना मा.तहसिलदार साहेब ,मा.वैद्यकिय अधिक्षक,मा.मुख्यधिकारी यांच्या कडून देण्यात येत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE