ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरिक्षक श्रीकांत पाडुळेंचे कायदेविषयक मार्गदर्शन
प्रतिनिधी सुनिल भोसले
पांडे येथे करमाळा तालुक्यातील 51ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याच्या अनुषंगाने कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी पांडे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे म्हणाले, ग्रामपंचायत सदस्य कसा असावा तो पदासाठी लायक असावा निवडुण आल्यावर सर्व मतभेद बाजूला ठेवून गावाचा विकास करणारा आसावा. तसेच निवडणूकीच्या दरम्यान बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न करून बक्षिस मिळवून गावाचा कायापालट करणारा असावा असे योग्य मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना सांगितले, ग्रामपंचायत सदस्य हा कसा असावा त्याला ग्रामपंचायत चालवण्याच्या अनुभव असावा यावर पोपटराव पेरे पाटील याचे उदाहरण दिले. पाटोदा येथे रोज सकाळी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला गरम पाणी आंघोळीसाठी दिले जाते. तेथील सांडपाणी अंडरग्राऊंड गटारीतुन बाहेर काढले जाते. याच पध्दतीने ग्रामपंचायत सदस्य असावा भांडण तंटे वाढु नये. तसेच वाद विवाद न करता जागेवर मिठवले पाहिजे असे अनेक कायदेविषयक मार्गदर्शन केले.
यावेळी गोरख अनारसे, बाळासाहेब अनारसे, मारूती भोसले,सुनिलाल मुजावर भागवत दुधे आप्पा भोसले अनिल तेली संदिपान दुधे प्रल्हाद मेहेर शिवाजी भोसले, महादेव भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते.