उंदरगाव परिसरात बिबट्याला बघिल्याचा दावा ; बिबट्याचा प्रवास मॅप च्या माध्यमातून
करमाळा समाचार
मागील दोन वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी बिबट्या मिळून आला होता आता त्याच भागात नरभक्षक बिबट्याचा वावर असल्याबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. आज सकाळी उंदरगाव येथील माळी वस्ती येथे हनुमंत नाळे यांना 7.45 am वा बिबट्या दिसल्याची प्राथमिक माहिती वनविभागाला दिली त्यानंतर ठिकाणी पिंजरे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे आतापर्यंत शोध मोहिमेमध्ये बिबट्या मिळून आला नाही तरीही परिसरात नागरिकांनी जाग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
उजनीच्या जलाशयाच्या पट्ट्यामुळे बिबट्याला आपला मार्ग वेळोवेळी बदलावा लागत आहे. प्रत्येक वेळी तो दक्षिण दिशेने जातो असा इतिहास जरी असला तरी करमाळा परिसर हा त्याच्यासाठी अडचणीचा ठरत आहे. चिखलठाण, सांगवी, बिटरगाव , वांगी परिसरात दर्शन दिल्यानंतर आता मात्र बिबट्याने थेट पश्चिम दिशेला उंदरगाव परिसर घातला आहे. त्या परिसरात ही वनविभागाचे कर्मचारी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पाहणी केली. परंतु अद्याप तरी काही हाती लागले नाही. पण तरीही त्या परिसरात बिबट्या पकडण्यासाठी सापळा रचण्यात आलेला आहे. सुरुवातीला ज्या भागात वन विभागात सापळा रचत होते. त्यात आणि उपस्थित लोकांमध्ये थोडा संभ्रम होता. पण नंतर लोकांनी सांगितले त्या दिशेला सापळा असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
अशा दिशेने बिबट्याचा वावर सुरू आहे. बिबट्या हा वन्यजीव प्राणी असल्याने कधीही कुठेही कसाही जाऊ शकतो. त्याला दिशांची बंधने जरी नसली तरी त्याची एकच दिशा ठरलेली होती. तो उत्तर दिशेने दक्षिण दिशेकडे जात होता. पण आता पाण्याच्या बाजूला असल्याने पुन्हा पुन्हा त्याच त्याच गावांमध्ये बिबट्याचा वावर दिसून येत आहे. पण आता मागील काही दिवसापासून एकाच परिसरात आढळणाऱ्या बिबट्या आता तिथून काही अंतरावर पुढे सरकला आहे. त्यामुळे वनविभागाची चिंता वाढवणारा हा विषय आहे. 14 पथके आतापर्यंत कार्यरत असून आता उंदरगाव व परिसरातील भागातही वन विभागाला लक्ष ठेवावे लागणार आहे.