करमाळासोलापूर जिल्हा

तालुक्यातील बागल – पाटील गटांनी एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात

करमाळा समाचार 

तालुक्याच्या राजकारणात बलाढ्य असलेल्या दोन गटांनी एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात जेणेकरून आमच्यासारख्या नवीन गटांचा यातून फायदा होईल अशी इच्छा जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील(atul khupase) यांनी व्यक्त केले आहे. इच्छा व्यक्त करत असताना त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या रश्मी बागल (rashmi bagal) यांना उद्देशून मी हे वक्तव्य केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बागल यांनी पाटील यांच्यासोबत जाण्यास हरकत नाही असे ते वक्तव्य होते.

करमाळा (karmala) तालुक्यात शिवसेनेचे जेष्ठ नेते मंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र यांच्या वाढदिवसाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित महायज्ञ आरोग्याचा महायज्ञ या कार्यक्रमाचे आयोजन चिवटे यांनी केले होते. तसेच पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानिमित्त व महायज्ञ कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी तालुक्यातील विविध गटातटाचे नेते यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. तर ह्या महायज्ञाच्या पहिल्या दिवशी इतर नेतेमंडळींच्या करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून गेले होते. त्याच पार्श्वभूमीवर खूपसे पाटलांनी सदरचे वक्तव्य केले आहे.

यावेळी बोलताना खूपसे पाटलांनी सांगितले की, आपल्याला माढ्यातील छत्तीस गावांचा चांगलाच अनुभव असून करमाळ्याच्या राजकारणातही ही सध्या आपण कामाच्या माध्यमातून लक्ष देत आहोत. मी बोलत आहे ते मस्करी म्हणून घेऊ नये तर दोन्ही गटांनी एकत्र येत निवडणुका लढवल्या तर नक्कीच फायदा होईल. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजक हे चिवटे बंधू होते. तर महेश चिवटे यांच्या व्यासपीठावर दोन्ही नेत्यांचे येणे हे दोन मोठे गट एकत्र येण्याच्या दिशेने पहिले पाऊल असू शकते. त्या दृष्टीने विचार करायला करायला काय हरकत नाही असे मत यावेळी खूपसे यांनी व्यक्त केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE