शिवसेना उमेदवार निवडुन द्या तालुक्याचा कायापालट करु – चिवटे
करमाळा समाचार
वीज बील माफ केले शिवाय इथुन पुढे साडे सात एच पी चे बील येणार नाही अशी सोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आता पर्यत १४७ कोटी नुकसान भरपाई व निधी म्हणुन जमा झाले आहेत. आता पर्यत शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठ्याप्रमाणावर रक्कम आली आहे. तर पीक वीमाही आता केवळ एक रुपयात मिळतोय ही आर्थीक मदत शिंदे साहेबांनी केलीय अनेक योजनांच्या माध्यामातून शिंदे मदतीचा हात देत आहेत असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांनी केली. तर शिंदे साहेबांनी तब्बल २४ हजार दाखले देण्याचे नियोजन शिंदे साहेबांमुळे झाले असल्याचेही चिवटे यांनी सांगितले.
चिवटे हे केम येथे दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलत होते. यावेळी महावीर तळेकर, महेश तळेकर सर, किरण बोकण , परमेश्वर तळेकर, ऐश्वर्या भणगे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाला मिळालेले दाखले व इतर योजनांची माहीती महेश चिवटे यांनी दिली तर आदिनाथ व मकाई या कारखान्यानाही सुस्थीतीत आणले जाईल असेही सांगितले. मराठा दाखलेच नव्हे तर समाजाचे हिताचे निर्णय शिंदे साहेबांनी घेतले आहेत. तर शिवसेनेचा उमेदवार निवडुन द्या तालुक्याचा कायापालट करु शिवाय केम चे प्रश्न थेट मुख्यमंत्री यांच्या पर्यत मांडु असे आश्वासन चिवटे यांनी दिले.
लाडकी बहिण व इतर योजनांसह मुलींच्या उच्च शिक्षणापर्यंत मुलींना शिक्षण मोफत केले आहेत. शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य कुटुंबाच्या प्रपंचाची अर्थकारणाशी निगडित असलेल्या सर्व योजना आणल्याने प्रत्येक माणसाला मजबूत करण्याचं काम महायुती सरकारने केले आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले या गोष्टीचा आपण कुठेतरी विचार कऱावा.
रिटेवाडी, दहिगाव साठी शिंदेंचे सहकार्य तर आज पर्यत मला पंचवीस कोटींचा निधी दिला मी त्याचा वापर तालुक्याचा विकास करण्यासाठी केला तर आमदार शिंदे ज्या निधीचा गवगवा करतात त्या प्रत्येक निधीवर मुख्यमंत्री म्हणुन शिंदे साहेबांची सही आहे. कोणाच्याही भुलथापांना बळी पडु नका. उमेदवार कोण आहे न पाहता थेट एकनाथ शिंदेंना मतदान करीत असल्या प्रमाणे मतदान करावे. केम हा शिवसेनेचा बालेकिल्ला असुन इथे लाठ्या काठ्या खाल्ल्या पण शिवसेना सोडली नाही. त्यामुळे पहिल्या क्रमांकांची मते मिळतील हे दिसुन येत आहे.