करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मकाई निवडणुक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज ; वीस टेबल च्या माध्यमातून मोजणी

करमाळा समाचार

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. यावेळी एकूण 20 टेबल च्या माध्यमातून सदरची मोजणी केली जाणार आहे. तर 110 कर्मचारी यावेळी उपस्थित असतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांनी दिली आहे.

करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणीची संपूर्ण तयारी पार पडत आहे. यावेळी सर्व नियोजन प्रमुख अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी माहिती देताना टोम्पे यांनी सांगितले की मतमोजणी प्रतिनिधी म्हणून वीस टेबलवर दोन्ही गटाचे 20 असे प्रतिनिधी तर 13 उमेदवार हे उपस्थित असतील. त्यांच्या शिवाय इतरांना आत मध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

तर समर्थकांनाही आत मध्ये प्रवेश दिला जाणार नसून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या बाहेर तसेच पोलीस ठाण्याच्या मेन गेटच्या बाहेर बॅरीगेटिंग केली जाणार आहे. शिवाय आत मध्ये जेवढे प्रतिनिधी असतील त्यांना मोबाईल नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. ज्या पत्रकारांकडे तहसीलचे अधिकृत पत्र असेल त्यांना जात प्रवेश दिला जाईल..

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE