माढा लोकसभा वंचीत बहुजन आघाडीची नवी कार्यकारणी जाहीर ; करमाळ्याच्या ओहोळ यांची उपाध्यक्षपदी निवड
करमाळा समाचार –
वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा मतदारसंघ (सोलापूर) कार्यकारिणी जाहीर ; सुभाषबापू ओहोळ यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा माढा मतदारसंघातील विभागीय कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यानुसार माढा लोकसभा मतदारसंघ विभागीय जिल्हा अध्यक्ष पदी गोपाल घाडगे देशमुख तर जिल्हा उपाध्यक्ष पदी करमाळा तालुक्यातील सुभाषबापू ओहोळ यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल तालुक्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

चार वेळा करमाळा तालुका अध्यक्ष पदावर निष्ठापुर्वक काम केले याची दखल पक्षाने घेतली आहे. यापुढे पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी निष्ठापुर्वक पार पाडू आणि पक्ष संघटनात्मक पातळीवर बांधनी करून वंचित बहुजन समाजाला न्याय देणार.
– सुभाष ओहोळ, नुतन उपाध्यक्ष